• मा. अॅड. बाळासाहेब आपटे

    विषेश वृतांत !

    बाळासाहेबांच्या जीवनाची वैषिष्टये दुर्मिळ असा संयोजक, नेटका समन्वयक, कार्यकर्त्यांचे मोहोळ निर्माण करणारा कार्यकर्ता, धेयधूंद कार्यकर्ता, निष्ठावंत प्रचारक, कुशल संघटक ...



  • स्वर्गीय अॅड. परशुराम भगीरथ आपटे !

    जीवनपट

    स्वर्गीय अॅड. परशुराम भगीरथ आपटे हे एक बुध्दीमान आणि अतिशय हुशार असे व्यक्तीमत्व होते. ते दादासाहेब या नावाने सर्वत्र परिचीत होते...

  • आपटे वाडा

    आपटे वाडा

    राजगुरूनगरच्या सामाजिक, शैक्षणिक, सहकार, सांस्कृतीक आणि राजकीय अशा सर्व विविध क्षेत्राचा ज्या ठिकाणी उगम झाला, तो गावची मायभुमी असलेला आपटेवाडा या नावाने सर्वत्र परिचीत आहे...

शिक्षण व कुटुंब

सुसंस्कृत कुटूंबात जन्माला येणे आणि अनेकांना त्यात प्रेरणा देणे हे भाग्य बाळसाहेबांना लाभले. आपले दहावी पर्यंतचे शालेय शिक्षण हे बाळासाहेबांनी खेड येथे महात्मा गांधी विद्यालय या आपल्या जन्मगावी घेतले. मॅट्रीक झाल्यानंतर बाळासाहेब पुढील शिक्षणासाठी पुण्यात आले.

अधिक वाचा

मनोगत

पन्नास वर्षापुर्वी आम्ही गावातल्या सर्व थरांतल्या मंडळींनी जमून को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली, तेव्हा बँकेचा सगळा संसार माझ्या कचेरीच्याच एका भागात असलेल्या एका कपाटात मावण्याइतका बंदिस्त, नेमस्त होता. हा व्याप वाढता वाढता आज बँकेची स्वत:ची तिमजली इमारत आहे.

अधिक वाचा

दादासाहेब आपटे !

स्वर्गीय बाळासाहेबांचे वडील हे एक बुध्दीमान आणि अतिशय हुशार असे व्यक्तीमत्व होते. खेड तालुका एज्युकेशन सोसायटीत पहिले मानद सचिव म्हणून दादांनी पद भुषविले आणि शाळा सुरू करण्यासाठी आपल्या वाड्यातील काही खोल्या वर्ग म्हणून उपलब्ध करून दिल्या.

अधिक वाचा

आपटे वाडा !

राजगुरूनगरच्या सामाजिक, शैक्षणिक, सहकार, सांस्कृतीक आणि राजकिय अशा सर्व विविध क्षेत्राचा ज्या ठिकाणी उगम झाला, तो गावची मायभुमी असलेला स्वर्गीय अॅड. परशुराम भगीरथ आपटे ह्यांचा आपटेवाडा या नावाने सर्वत्र परिचीत असलेला हा वाडा आज ही गावामध्ये सन्मानाने डोलत आहे.

अधिक वाचा
  • मोहन भागवत

    सरसंचालक, रा.स्व.संघ

    "हिंदू समाज संघटीत आणि उन्नत व्हावा या ध्येयासाठी प्रा. बाळासाहेब आपटे यांनी त्यांचे आयुष्य समर्पित केले. राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी आवश्यक असणारे अनुशासन त्यांनी आयुष्यभर पाळले आणि इतरांनीही ते पाळावे याकरिता ते आग्रही राहिले. अर्थात बाळासाहेबांची सगळ्यात पहिल्यांदा आठवणारी गोष्ट म्हणजे त्यांनी स्पष्टपणे वा कधी परखडपणे केलेले मैत्रीपूर्ण मार्गदर्शन. ज्या मार्गदर्शनामुळे अनेकांना दिलासा, स्थिरता आणि प्रेरणा मिळाली. "

  • एम. हमीद अन्सारी

    भारताचे उपराष्ट्रपती

    "श्री. बाळ आपटे असे एक प्रख्यात संसदपटू आणि राजकीय नेते होते ज्यांना लोककल्याणाची निरंतर जाणिव होती आणि त्याकरिता ते विविध मंचावर अथकपणे कार्यरत राहिले. ते विख्यात वकील आणि नावाजलेले शिक्षणतज्ञही होते. "

  • एस. एच. कपाडिया

    भारताचे माजी मुख्य न्यायमूर्ती

    "बाळासाहेब, याच नावाने ते वकीलवर्गात ओळखले जात. साधेपणा, विन्रमता आणि वास्तवाचे नित्य भान ही त्यांची वैशिष्टे होती. ते स्वत: वरिष्ठ वकील असले तरी काही वरिष्ठांकडे असणारा उद्दामपणाचा त्यांना स्पर्शही नव्हता. ते सर्वांशीच विशेषत: ज्युनइर वकिलांशी आदराने वागत. त्यांच्या अशा चंगुलपणाचा मी प्रशंसक होतो. आपल्या सर्वांनाच बाळासाहेबंकडून व्यावसायिक वृत्ती संदर्भात शिकण्यसारखे आहे. ""बाळासाहेब, याच नावाने ते वकीलवर्गात ओळखले जात. साधेपणा, विन्रमता आणि वास्तवाचे नित्य भान ही त्यांची वैशिष्टे होती. ते स्वत: वरिष्ठ वकील असले तरी काही वरिष्ठांकडे असणारा उद्दामपणाचा त्यांना स्पर्शही नव्हता. ते सर्वांशीच विशेषत: ज्युनियर वकिलांशी आदराने वागत. त्यांच्या अशा चंगुलपणाचा मी प्रशंसक होतो. आपल्या सर्वांनाच बाळासाहेबंकडून व्यावसायिक वृत्ती संदर्भात शिकण्यासारखे आहे. "