स्वर्गीय श्री. परशुराम भगीरथ आपटे - चरित्र !
प्रसन्न व्यक्तिमत्व, करारी मन, तेजस्वी चेहरा, पुणेरी पगडी अन बंद कोट, धोतर – खरोखरीच साधी राहणी व विद्येमुळे जीवनास कृतार्थता आणि व्यक्तीस श्रेष्ठता लाभते हे खरेच.
दादासाहेब हे खरोखरीच कर्मयोगी! त्यांचा जन्म खेडला झाला. प्राथमिक शिक्षण खेडमध्ये तर माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले. मुंबई येथे हायकोर्टाची प्लीडर हि परीक्षा उत्तीर्ण होऊन वडिलांची आज्ञा शिर्संवाद्य मानून खेड येथे १९२२ मध्ये वकिली सुरु. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, व निरपेक्ष बुद्धीने काम करण्याची तळमळ असल्यामुळे खेड ग्रामपंचायतीची स्थापना, खेड अर्बन को-ऑप बुनक तसेच खेड तालुका एजू. सोसायटीची स्थापना दादासाहेबांनी केली. आज ह्या सर्व संस्था नावारूपाला येऊन यशस्वीपणे कार्यरत आहेत.
स्वर्गीय बाळासाहेबांचे वडील हे एक बुध्दीमान आणि अतिशय हुशार असे व्यक्तीमत्व होते. ते दादासाहेब या नावाने सर्वत्र परिचीत होते. स्वर्गीय दादासाहेब राजगुरूनगरचे (खेड) पहिले सरपंच होण्याचा मान (सन १९२२ ते सन १९३०) या कालावधीमध्ये मिळाला. याच काळात दादांनी जनतेच्या अर्थकरणाची गरज ओळखुन आपल्या राहत्या आपटे वाड्यामध्ये दिनांक १९/०६/१९३१ रोजी खेड अर्बन बँकेची स्थापना केली. तसेच सन१९३८ रोजी स्थापना झालेल्या खेड तालुका एज्युकेशन सोसायटीत पहिले मानद सचिव म्हणून दादांनी पव भुशविले आणि शाळा सुरू करण्यासाठी आपल्या वाड्यातील काही खोल्या वर्ग म्हणून उपलब्ध करून दिल्या. गावामध्ये दादांनी पहिली वॉटर स्किम आणली आणि गावातील पहिली विजही आपटे वाड्यात तिाा प्रयोग सुरू करणे बाबत ते यशस्वी ठरले. सन 1918 साली लोकमान्य टिळक गावामध्ये दिक्षीत वाड्यात आले होते. त्यावेळी दादा आपट्यांनी लोकमान्यांच्या जाहिर सभेचे नेतृत्व केले होते. त्याच जाहिर सभेत लोकमान्यांच्या सभेस हजर राहिलेल्या हुतात्मा शिवराम हरी राजगुरू हा युवक पुढे देशासाठी स्वातंत्र्य संग्रामात लढला आणि त्यांनी दिनांक 23 मार्च 1931 साली देशासाठी हौतात्म्य पत्करले. त्या हुतात्मा राजगुरूंच्या स्मृती प्रित्यर्थ खेड ह्या गावाचे नाव पुढे राजगुरूनगर असे ठेवण्यात आले. .
दादासाहेबांच व्यक्तिमत्व ठसठशीत होत. वेष साधा पण नीटनेटका असे. धोतर पांढरशुभ्र सदरा अन बंद गळ्याचा वकिली कोट, डोलदार उपरणं अन डोक्यावर पगडी हा त्यांचा वेश. कोर्टात जाताना ते या वेशात दिसले कि त्यांचा कुणालाही आदराचा वाटावा. पक्षकारांचा घोळका बरोबर ण घेता ते एकटेच कोर्टात जात. बरोबर जामानिमा वा कोणताही डामडौल त्याना रुचला नाही. याचा अर्थ ते स्वतःला कुणी वेगळे समाजात होते असा मुळीच नाही. उलट साधेपणावर त्यांचा कटाक्ष होता.
दादासाहेबांनी यशस्वीपणे वकिली केली. त्यांच्या व्यवसायात ते पूर्ण लक्ष घालत आणि कुणाचेही आपल्या हातून नुकसान होणार नाही याची ते दक्षता घेत. व्यवसायाचा जम त्यांनी परिश्रमपूर्वक बसविला होता. त्यामुळे त्यात कधी चढ उतार झाला नाही. सकाळी पूजा आटोपली कि ते कार्यालयात येत. साधी गाडीची बैठक, पुढे बसक डेस्क व खोलीभर सतरंजी हे त्याचं ऑफिस. दादाचं सारे मोठेपण ज्यांच्यामुळे उजळल ते सौ. माई मुळे. दादांची त्या प्रेरणाशक्ती होत्या. दादांनी सौ. माईंना प्रोत्साहन द्यायचं आणि माईंनी दादांना काही कमी पडू द्यायचे नाही अस ठरलेलाच होते जणू. दादा रोज सायंकाळी नियमाने केदारेश्वराच्या दर्शनासाठी जात. श्री. तात्यासाहेब दीक्षित वकील, श्री. रघुनाथराव ओशी किंवा आणखी कोणीतरी त्यांच्यासोबत असत. एकत्र जमण्याचे ठिकाण म्हणजे पोटभरे यांचा ओटा. तेथेच त्यांचात अनेक विषयांवर चर्चा होत.
बाळ आपटे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेताना आपटे कुळाचे आणखी एक वैशिष्ठ्य नमूद करणे आवश्यक आणि महत्वाचे आहे. कायद्याच्या क्षेत्रातील नेपुण्य हा आपटे कुलपरंपरेच्या अध्यात्मिक मानसिकतेचा, धर्मपरायणतेचा आणि पांडिलाचाच एक भाग होता असे म्हटले पाहिजे. मंदिरांची उभारणी सर्व धार्मिक उत्सवामध्ये भरीव योगदान, सामाजहिताच्या विविधांगी कार्यात पुढाकार हे आपटे कुटुंबाचे पिढीजात वैशिष्ट्य.
दादासाहेबांनी खेडमध्ये व्यतीत केलेले जीवन हा समाजहितैषी जीवनाचा एक उत्कृष्ठ आदर्श ठरावा. त्याची वकिली उत्तमच चालत होती. खेड तालुका न्यायालयाच्या प्रकरणांपैकी निम्मी अधिक प्रकरणे दादासाहेबांकडेच होती. मात्र वकिली व्यवसायाच्या व्यस्ततेत मग्न असतानाही अन्य अनेक सामाजिक उपक्रमांकडे लक्ष पुरविण्याचा त्यांचा सतत कटाक्ष असे. संबंध खेड गावाला वीजेचा आणि पाण्याचा पुरवठा सुरु व्हावा यासाठी आवश्यक तो दीर्घकालीन पाठपुरवठा त्यांनी केला.
दादासाहेब धार्मिक विचारणा कमी लेखात नव्हते. पण समाजाला आज कशाची गरज आहे हे त्यांनी ओळखले होते. सामाजिक प्रयत्नांतून एकात्मता यावी यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांची सामाजिक प्रतिष्ठा लोकमान्य होती. आपले विचार कृतीत आणले तरच त्या विचारांशी आपण निष्ठावान आहोत अशी त्यांची धारणा होती. म्हणून बेगडी देशाभाक्ती त्यांनी कधी केली नाही. आणि विचारांचे प्रदर्शन करून स्वार्थ साधला नाही. आपल्याला प्रमानिकापणाने जे पटत ते निर्भयपणे ते करीत.
