बाळासाहेब आपटे - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद !

ओळख !

बाळासाहेब आपटे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अतुट नाते सर्वांनाच परिचीत आहे. एम. ए. चा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना १९६३ च्या सुमारास श्रीकांत धारप आणि सुरेश मोडक यांच्या साथीने परिषदेत सक्रीय झाले. त्यावेळी प्रा. यशवंतराव केळकर विद्यार्थी परिषदेचे होते. एकीकडे कायद्याचा विद्यार्थी तर दुसरीकडे दादरच्या न्यू लॉ कॉलेजमध्ये (अर्धवेळ) प्राध्यापक अशा दोन्ही बाजुंनी परिषद कार्यकर्ता होण्याची तांत्रिक पात्रता ही त्यांच्याकडे होती. लग्नानंतर माहिमला राहायला आल्यानंतर घरी परिषदेच्या कार्यकत्यांचा सतत राबता असायचा. १९६३ साली एस.एन.डी.टी विद्यापीठाने परिक्षा फी मध्ये लक्षणीय वाढ केली होती. पन्नास रुपयांवरुन १२५ रुपये एवढी वाढ करण्यात आली. त्याविरुध्द तेथील विद्यार्थीनींनी आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाचे नेतृत्व विद्यार्थी परिषदेकडे होते. तीन आठवडे चाललेल्या ह्या आंदोलनास संपूर्ण यश मिळाले. फी वाढ पूर्णपणे मागे घेण्यात आली. या आंदोलनात बाळासाहेबांचा सक्रीय सहभाग होता. याच महत्वपूर्ण कालखंडात बाळ आपटे त्या कार्यकर्ता समूहातील एक प्रमुख सदस्य बनत गेले.

 

कार्यकर्ता ते अध्यक्ष !

एकीकडे संघटनेचे जाळेही देशभरात विस्तारित चालले होते, राष्ट्रहितैषी छात्रशक्ती या नात्याने विविध विचारांचा विद्यार्थी वर्गही देशाकारणात व्यापक परिमाणात सक्रीय होता. अधिकृत नोंदणीचा विचार करता १९७४ साली परिषदेच्या कामाला पंचवीस वर्षे पूर्ण होत होती. ते संपूर्ण वर्ष ‘रजत जयंती’ म्हणून साजरे करायचे ठरले. त्या वर्षीचे राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत करण्याचा निर्णय झाला. याविषयी च्या चिंतन आणि आयोजनाच्या कामात बाळ आपटे यांचा लक्षणीय सहभाग होता. मुंबई च्या माटुंगा दादर परिसरात नोव्हेंबर १९७४ मध्ये तोपर्यंतचे सर्वात मोठे अधिवेशन पार पडले. याच अधिवेशनात प्रा. बाळ आपटे परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवडले गेले.

नियमित होणार्‍या नगरपरिषदा हा त्या दिवसात संघटनात्मक जडणघडणीचा आणि कार्यक्रमांचा प्रमुख भाग होता. कार्यकारिणीच्या स्तरावर धोरणात्मक निर्णय होत. या निर्णयांच्या चर्चेत आणि प्रक्रियेतही साप्ताहिक बैठकींचे सुत्र संचालक बाळ आपटे यांची प्रमुख भूमिका असेच. दर तीन चार महिन्यातून एकदा होणार्‍या या नगरपरिषदांमध्ये बाळ आपटे यांचे भाषण हे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने प्रमुख आकर्षण असायचे. विद्यार्थी चळवळीतील एक सक्षम कार्यकर्ता म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत आपले विशेष स्थान निर्माण केले. ही संघटना निर्माण करण्यासाठी बाळासाहेबांनी पन्नास वर्षे योगदान दिले. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नव्हे तर आजचा नागरीक आहे. आणि त्या दिशेने चळवळीची वाटचाल झाली पाहिजे असे त्यांचे प्रतिपादन होते. महाराष्ट्रात सुरु झालेली विद्यार्थी परिषद ज्यांनी आपल्या परिश्रमाने अखिल भारतीय स्वरुपाची केली एवढेच नव्हे तर एक जबाबदार संघटक म्हणून भूमिका प्रत्यक्षात आणली त्याचे बाळासाहेब हे कर्णधार होते. अनेक वर्षे त्यांनी या परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्षपदही भूषविले.

 

आणि बाणी !

सन १९७५, १९७७ च्यसन १९७५, १९७७ च्या आणि बाणीच्या कालखंडामध्ये एक प्रकारे सत्वपरिक्षा होती. २६ जून ला आणीबाणी जाहीर झाली, ४ जुलाई रोजी रा.स्व. संघासह २७ संघटनांवर बंदी घालण्यात आली. मिसाखाली धरपकड आणि वृत्तपत्रांवर सेन्सोर्शीप यासह जनतेच्या मुलभूत हक्कचाही संकोच करण्यात आला. ९ जुलाई रोजी परिषदेचा अभ्यासवर्ग मुंबईच्या पोतदार महाविद्यालयात आयोजित करण्यात अलाल होता. या अभाय्सावार्गात बाळ आपटे यांचे ‘सद्य:स्थिती आणि विद्यार्थी परिषद’ या विषयावर भाषण झाले.एकूण परिस्थिती पाहता त्यांचे हे भाषण धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे होते. कोणत्याही विषयाचे वस्तुनिष्ठ, तर्कशुद्ध विश्लेषण हा आपटे यांचा गुण होताच. त्यांचे भाषणही या वैशिष्ट्याला साजेसेच झाले. आणीबाणी चे खरे स्वरूप, तिने उभे केलेले विक्राळ आव्हान आणि त्या आव्हानाचा मुकाबला करण्याची निकड याची बाळ आपटे यांनी अत्यंत समर्पक शब्दांत मांडणी केली. ”ही विचारांची लढाई आहे तशीच ती दीर्घकालीन आणि दमछाकीची लढाई आहे (It’s a long idealogical battle; a war of nerves) हुकुमशाही शासन ही आपल्या समाजाच्या पचनी पडणारी व्यवस्था नाही, ती हिताचीही नाही. मात्र ती झुगारून देणे सोपे नाही. लोकशाहीवर आस्था बाळगणाऱ्या सर्व शक्ती- प्रवृत्तींनी एकजुटीने नेटाने आणि जिद्दीने विरोध करणे अत्यावश्यक आहे. एका बाजूला सर्व शक्तिमान शासनकर्ते तर दुसऱ्या बाजूला संघटीत जनशक्ती यांच्यातील हा संघर्ष आहे. कोण आधी ठाकते यावर ह्या संघर्षाची परिणीती अवलंबून आहे...”