अॅड. आदरणीय बाळासाहेब आपटे - आणीबाणी

सन १९७७ च्या आणीबाणीच्या कालखंडामध्ये एक प्रकारे सत्वपरिक्षा होती. २६ जून ला आणीबाणी जाहीर झाली, ४ जुलाई रोजी रा.स्व. संघासह २७ संघटनांवर बंदी घालण्यात आली. मिसाखाली धरपकड आणि वृत्तपत्रांवर सेन्सोर्शीप यासह जनतेच्या मुलभूत हक्कचाही संकोच करण्यात आला. ९ जुलाई रोजी परिषदेचा अभ्यासवर्ग मुंबईच्या पोतदार महाविद्यालयात आयोजित करण्यात अलाल होता. या अभाय्सावार्गात बाळ आपटे यांचे ‘सद्य:स्थिती आणि विद्यार्थी परिषद’ या विषयावर भाषण झाले.एकूण परिस्थिती पाहता त्यांचे हे भाषण धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे होते. कोणत्याही विषयाचे वस्तुनिष्ठ, तर्कशुद्ध विश्लेषण हा आपटे यांचा गुण होताच. त्यांचे भाषणही या वैशिष्ट्याला साजेसेच झाले. आणीबाणी चे खरे स्वरूप, तिने उभे केलेले विक्राळ आव्हान आणि त्या आव्हानाचा मुकाबला करण्याची निकड याची बाळ आपटे यांनी अत्यंत समर्पक शब्दांत मांडणी केली.”ही विचारांची लढाई आहे तशीच ती दीर्घकालीन आणि दाम्चाकीची लढाई आहे (It’s a long idealogical battle; a war of nerves) हुकुमशाही शासन ही आपल्या समाजाच्या पचनी पडणारी व्यवस्था नाही, ती हिताचीही नाही. मात्र ती झुगारून देणे सोपे नाही. लोकशाहीवर आस्था बाळगणाऱ्या सर्व शक्ती- प्रवृत्तींनी एकजुटीने नेटाने आणि जिद्दीने विरोध करणे अत्यावश्यक आहे. एका बाजूला सर्व शक्तिमान शासनकर्ते तर दुसऱ्या बाजूला संघटीत जनशक्ती यांच्यातील हा संघर्ष आहे. कोण आधी ठाकते यावर ह्या संघर्षाची परिणीती अवलंबून आहे...”

जुलाई ते सप्टेंबर १९७५ प्रारंभिक उभारणीत गेल्यानंतर ‘आणीबाणी विरोधी’ सत्याग्रह उभा करण्याचा निर्णय घेतला गेला. सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून घोषणा (‘आणीबाणी रद्द करा’ ची मागणी करणाऱ्या) देणे, पत्रकांचे वाटप करणे, कोपरासह घेणे असे सत्याग्रहाचे स्वरूप ठरले. नोव्हेंबर डिसेम्बर १९७५ आणि जानेवारी १९७६ असे तीन महिने हा सत्याग्रहाचा कालावधी निश्चित करण्यात आला. एका रोमहर्षक पर्वाला सुरुवात झाली. अ.भा.विद्यार्थी परिषदेचे अ.भा. अध्यक्ष या नात्याने बाळ आपटे यांनी दि १ डिसेंबर १९७५ रोजी या सत्याग्रहात स्वताला झोकून दिले.

त्या आणीबाणी विरोधी आंदोलनाचे स्वतः बाळासाहेबांनी नेतृत्व केले. आणीबाणीच्या काळात त्यांनी मुंबई विद्यापीठात सत्याग्रह केला. मिसांतर्गत अटक होवून एकोणीस महिने त्यांना नाशिकच्या तुरुगांत ठेवले गेले. या काळात तुरुंगात शेकडो विद्यार्थी होते. बदीवन कार्यकर्त्यांची मानसिकता आणि निष्ठा स्थिर राहावी यादृष्टीने तुरुंगात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित कार्यांत येत. या कार्यक्रमांची योजना करण्यासाठी ४-५ जणांची समिती बनविण्यात आली होती. बाळासाहेब त्यातले प्रमुख सदस्य होते. ‘सत्तालालसा विरुद्ध राष्ट्रहित’ असा हा वैचारिक संघर्ष आहे, दीर्घकाळाची दमाची लढाई आहे, हिटलर शाहीसारखे दामंणचक्र चालविले जाईल; अशा तर्कनिष्ठ विवेचानाद्वारे त्यांनी कार्यकर्त्यांची वैचारिक सिद्धता भक्कम केली तर दुसऱ्या बाजूने कडव्या संघर्षासाठी सिद्ध होण्यास प्रवृत्त केले.

सर्वशक्तिमान समजल्या जाणाऱ्या सत्तादामानासमोर कार्यकर्ताधीष्टीत जनसंघटन प्रभावीपणे उभे राहू शकते याची जाण आणि विश्वास निर्माण कार्यात बाळासाहेबांचे योगदान मोलाचे होते. ते स्वतः तर प्रभावीपणे सगळी मांडणी करीतच, पण त्याचबरोबर या मांडणीचे विविध पैलू समर्पकपणे उलगडून दाखविणाऱ्या २०-२५ कार्यकर्त्यांचा गातही त्यांनी उभा केला. कार्यकर्त्यांची नियमित बैठकाही त्यांनी सुरु केली. राजकीय परिस्थिती, तरुणांचा सामाजिक सहभाग, आगामी काळाची आव्हाने, संघर्षाची परिभाषा आणि व्युहरचना इ. विषयांचा उहापोह ह्या बैठकीत व्हायचा. विद्यार्थी परिषदेचा ‘दलागत राजनीती से अलिप्त’ हा सैद्धांतिक आग्रह आणि राष्ट्राकारानाच्या भूमुमिकेतून तत्कालीन परिस्थितीत आपद्धर्म म्हणून राजकीय चळवळीत प्रत्यक्ष सहभागाचे धोरण यांचाय्तील समतोल त्यांच्या मांडणीतून येत असे.पुढे निवडणुका जाहीर होऊन जनता पार्टीच्या निर्मितीच्या माध्यमातून प्रत्यक्ष राजकीय प्रकारचे काम करण्याची वेळ आली त्यावेळी परिषद कार्यकर्ता वर्ग नि:साशाकपणे आणि स्पष्ट वैचारिक भूमिकेचे भान बाळगून सक्रीय झाला.

कारागृहातही बाळ आपटे यांच्या आस्थेवाईक प्रवृतीचा प्रत्यय अनेकांनी घेतला. कार्यकर्त्याला खचू न देणे, त्याच्या सुख दु:खाची आणि प्रासंगिक नैराश्याची दाखल घेणे, त्याची आत्मीय विचारपूस, त्याची प्रकृती, त्याची कौटुंबिक स्थिती इ. ची चौकशी करून आवश्यक आणि शक्य त्या सर्व साहाय्य ची व्यवस्था करणे. करावासतील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ‘Educational Change’ हे पुस्तक याच काळात बाळासाहेबांनी लिहून काढले. विद्यार्थी चळवळीच्या आणि शिक्षण क्षेत्रातील संघटना या नात्याने विद्यार्थी परिषदेच्या कामाच्या माध्यमातून शैक्षणिक परिवर्तनाविषयी वेळोवेळी जे चिंतन झाले त्याच्या आधारावरील हे पुस्तक.

विद्यार्थी परिषदेच्या बाळासाहेबांनी दोन पिढ्या घडविल्या. विद्यार्थी परिषदेन त्यांचे योगदान खरोखर मोलाचे होते. कार्यकत्यांचा वैचारिक पिंड समृध्द करणारे हे योगदान होते. एक कार्यकर्ता मित्र आणि विचारवंत असे त्यांचे मिश्रण होते. बाळासाहेब नेहमी स्नेही मिश्र, सहृदय या स्वाभाविकतेनच वावरत असत. यशवंतराव केळकरांचा व रामभाऊ म्हाळगी यांची लाभलेला सहवास हा त्यांना प्रेरणादायी होता. कार्यकर्ता विकास हा त्यांचा ध्यास होता. गेल्या दहा बारा वर्षातील राजकीय जीवनातील स्थानजरी मोठे असले तरी त्यांचा अधिक परिचय हा विद्यार्थी चळवळीतील योगदानातील हा आहे.